पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम...

ऍमेझॉनने आपली सेवा तूर्त स्थगित केलेली नाही.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी गंभीर पाऊल उचलले. संपूर्ण देशात बुधवारपासून पुढील २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमधून केवळ अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ऍमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांनी आपल्या सेवांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा काय आहेत जाणून घेऊया...

PM मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जोफ्राचे ट्विट व्हायरल

ऍमेझॉन 
ऍमेझॉनने आपली सेवा तूर्त स्थगित केलेली नाही. पण सध्या फक्त जीवनावश्यक वस्तूंच ग्राहकांना घरपोच पाठविण्यात येणार आहेत. इतर वस्तू तूर्त कोणालाही ऍमेझॉनवरून विकत घेता येणार नाहीत. घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्ये, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू एवढेच ऑनलाईन मागविता येणार आहे. ज्यांनी आधीच इतर वस्तू मागविल्या होत्या. त्यांना आता कंपनीकडून रिफंड दिला जाणार आहे.

फ्लिपकार्ट
फ्लिपकार्टने आपली सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कंपनीकडून कोणतीही ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाणार नाही आणि घरपोच वस्तू दिलीही जाणार नाही.

बिगबास्केट
बिगबास्केटनेही आपली सेवा तूर्त स्थगित केली आहे. सेवा पुन्हा कधी सुरू होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

लॉकडाऊननंतर आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली

ग्रोफर्स
ग्रोफर्सनेही आपली सेवा तूर्त बंद केली आहे. ग्रोफर्सचे साठवणूक केंद्र फरिदाबादमध्ये आहे. पोलिसांनी सध्या फरिदाबाद पूर्णपणे बंद केले आहे. पण आम्ही २४ तासांमध्ये सेवा पुन्हा सुरू करू असे ग्रोफर्सने म्हटले आहे.