पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॅनर्जी यांनी खास भारतीय पोशाखात स्वीकारला नोबेल पुरस्कार!

अभिजित बॅनर्जी

अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी भारतीय वंशाचे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी हे भारतीय पारंपरिक पोशाषात आल्याचे पाहायला मिळाले. स्वीडनमधील स्टॉकहोम कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थित होती. धोतर आणि बंदगळा कुर्ता, जॅकेट घालून त्यांनी नोबेल पुरस्कार स्वीकारला.

कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण

बुधवारी झालेल्या कार्यक्रमात अभिजित बॅनर्जी, त्यांची पत्नी इस्थर डफ्लो आणि अन्य अर्थशास्त्री मायकल क्रेमर यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. इस्थर डफ्लो यांनी निळ्या रंगाची साडी घातली होती. 

'मनोहर जोशींनी केलेले विधान ही त्यांची वैयक्तिक भूमिका'

अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय आहेत. या आधी अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील असलेले बॅनर्जी यांनी कोलकातामधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.