पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेल्सचा सुळसुळाट, सावध राहण्याचे आवाहन

प्राप्तिकर परतावा

प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेलपासून सावध राहण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. करदात्यांनी भरलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी आणि त्यातील परतावा लवकरात लवकर करदात्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. पण त्याचवेळी प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेलनेही अनेक जण नाहक चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात, याकडे विभागाने लक्ष वेधले.

सुप्रीम कोर्टाच्या 'रोस्टर'मध्ये सरन्यायाधीशांकडून महत्त्वाचे बदल

प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in किंवा www.incometaxindiaefiling.gov.in या दोन्हींपैकी कोणत्याही वेबसाईटवर लॉग इन केल्यावर लगेचच पहिला संदेश हा प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेलपासून सावध राहण्याचा येतो. जर तुम्ही विवरणपत्रामध्ये परताव्याची मागणी केली असेल, तर विभागाकडून त्यावर कशा पद्धतीने कार्यवाही केली जाते आणि तुम्हाला कसे कळवले जाते, याची माहिती लगेचच या संदेशातून दिली जाते आहे.

करदात्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्राप्तिकर विभागाकडून पाठविण्यात येणारे ईमेल हे व्यवस्थेतून थेट पाठवले जातात. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा सहसा थेट हस्तक्षेप नसतो. व्यवस्थेतून पाठविण्यात आलेल्या या ईमेलना उत्तर देण्याची गरज असतेच, असे नाही. जर तुम्हाला असा कोणता ईमेल आला तर तो नक्की प्राप्तिकर विभागानेच पाठविला आहे की नाही, हे तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. या वेबसाईटवर लॉग इन केल्यावर Reminders/Campaigns या टॅबवर क्लीक करा. त्यामध्ये तुम्हाला प्राप्तिकर विभागाने पाठविलेल्या सर्व ईमेल्सची आणि एसएमएसची माहिती असते. 

लवकरच मुंबई ते शिर्डी रेल्वेप्रवास फक्त ३ तासांत

२०१८-१९ या करनिर्धारण वर्षासाठी दाखल झालेल्या ७.१९ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांवरील कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखी उत्तरात लोकसभेमध्ये दिली. १,६१,४५७ कोटी रुपयांचा परतावा करदात्यांना देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.