पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Dhanteras 2019: जाणून घ्या धनत्रयोदशीला खरेदीचे मुहूर्त

धनत्रयोदशी २०१९ : सोने खरेदीचा मुहूर्त

दिवाळीच्या सणाला खऱ्या अर्थानं शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे.  दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा आहे. २५ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, वस्तू तसेच इतर वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. यादिवशी  घरी नव्या वस्तू खरेदी केल्यानं  देवी लक्ष्मीची कृपा राहते अशी अनेकांची मान्यता आहे. 

जिओचे नवे ऑल इन वन प्लॅन्स सादर, वाचा ग्राहकांना काय मिळणार

धनत्रयोदशीच्या निमित्तानं ग्राहकांची होणारी लगबग पाहता अनेक गृहपयोगी वस्तूंवर सवलती देण्यात आल्या आहेत. यावेळी  सोन्या चांदीचे भावही वधारले आहेत. असं असलं तरी ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह पाहायला मिळणार अशी दुकानदारांची आशा आहे. 

बजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का ?

खरेदीचा मुहूर्त 
२५ ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी साडेचार वाजल्यापासून खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. हा मुहूर्त २६ ऑक्टोबर दुपारपर्यंत राहणार आहेत. ज्यांना केवळ धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी दुपारी  साडेचार ते रात्रीपर्यंत चांगला मुहूर्त आहे.