पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Dhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

धनत्रयोदशी २०१९

धनत्रयोदशीला धनाची पूजा करण्याची परंपरा आहे. यादिवशी सोने, चांदीचे दागिने आणि इतर वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी खरेदी करणं शुभं मानलं जातं.

या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ
सोने- चांदीची नाणी 
लक्ष्मी किंवा गणपतीची प्रतिमा असलेलं सोन्या- चांदींचं नाणं खरेदी करणं शुभं मानलं जातं. अनेकजण या नाण्यांची  विधीपूर्वक पूजा करतात. 
गणेश- लक्ष्मीची प्रतिमा
लक्ष्मीपूजनासाठी धनत्रयोदशीलाचालक्ष्मीची  प्रतिमा किंवा मूर्ती खरेदी करणं शुभं मानलं जातं. यादिवशी लक्ष्मी, गणपतीची मुर्तीही खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

Dhanteras 2019: जाणून घ्या धनत्रयोदशीला खरेदीचे मुहूर्त 

पितळेची भांडी 
सोने- चांदीबरोबरच पितळेची खरेदी करण्याची प्रथा आहे. पितळ हे देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा प्रिय धातू आहे.  धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजाही केली जाते. त्यामुळे पितळेच्या भांड्यांची खरेदी शुभ मानली जाते.
चांदीचा  कलश 
धनत्रयोदशीला सोने- चांदीच्या दागिन्यांबरोबर चांदीचा कलश घेणंही शुभ मानलं जाते. या कलशात  धान्य किंवा पैसे ठेवण्याची अनेकांकडे प्रथा आहे. 
झाडू 
असं म्हणतात की झाडूत देवी लक्ष्मीचा वास असतो. धनत्रोयदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्यानं घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो अशी मान्यता आहे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू उपयोगी असते, तिच्यामुळे घरातील अस्वच्छता नकारत्मका दूर होते असा विश्वास आहे. अनेक जण लक्ष्मीपूजनादिवशी  झाडूची पूजा करतात.