पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

राहुल गांधी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने तीन वर्षांपूर्वी अचानकपणे केलेल्या निश्चलनीकरणाला अर्थात नोटाबंदीला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. याच निर्णयावर तेव्हापासून टीका करणाऱ्या विरोधकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा या निर्णयामुळे देशाचे कसे नुकसान झाले, याची आठवण करून दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट केले असून, त्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार

या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्याला ३ वर्षे झाली. या हल्ल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा बळी गेला, अनेक छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आणि अनेक भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या. हे सर्व ज्यांच्यामुळे घडले त्यांच्यावर अजून कायदेशीर कारवाई झालेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटसोबत त्यांनी ग्राफिक्सही जोडले आहे. ज्यामध्ये नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.

राम मंदिर निकाल : सरन्यायाधीशांनी उ. प्रदेशातील अधिकाऱ्यांना बोलावले

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या आकाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीचे विविध परिणाम नंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचे पाहायला मिळाले होते.