पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामदेव बाबांच्या पतंजलीच्या विक्रीमध्ये मोठी घट

रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण

दोन वर्षांपूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठे आव्हान देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनाच्या विक्रीत वेगाने घट झाली आहे. हा रामदेव बाबांना मोठा धक्का असल्याचे मानले जाते. 

पुढील १० वर्षे 'कपालभाती' करा, रामदेवबाबांचा विरोधकांना सल्ला

 वर्ष २०१८-१९ दरम्यान नऊ महिन्यांत म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत कंपनीची विक्री ४७०० कोटी रुपयांवर आली आहे. २०१७ मध्ये कंपनीची विक्री ९००० कोटी रुपयांच्या जवळपास होती. त्या वेळी कंपनीने २०१८ मध्ये विक्री २०,००० कोटी रुपयांवर पोहोचवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. २०१८ मध्ये त्यांची विक्री वाढण्याऐवजी १० टक्क्यांच्या घसरणीसह ८१०० कोटी रुपयांवर पोहोचली. 

तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार देऊ नका - रामदेव बाबा

कंपनीने त्यांच्या वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे. २०१६ मध्ये आलेली नोटबंदी आणि २०१७ मध्ये जीएसटीमुळे ही घसरण दिसून आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पतंजली ब्रँडची ९८.५५ टक्के मालकी रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याकडे आहे. कंपनीने ३ ते ४ नवीन युनिट सुरू केल्याने अशी स्थिती होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजलीचे ३,५०० वितरक आणि ४७,००० किरकोळ विक्रेते आहेत.