पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे स्थानिक बाजारात दिवसागणिक कोट्यवधीची घसरण

आगामी काही काळ बाजारात चिंतेचे वातावरण कायम राहण्याचे संकेत (संग्रहित)

कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशातील व्यापार ठप्प झालाय. वेगवेगळ्या राज्यातील लॉकडाऊनचा स्थानिक बाजारात मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे दिवसाला जवळपास 6 हजार कोटी इतका फटका सहन करावा लागत आहे. 

एक कोरोनाबाधित रुग्ण कमाल चार जणांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो, संशोधन

किरकोळ व्यापाऱ्यांचा महासंघाचे {कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स} (कॅट) महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक मंदीची स्थिती असताना कोरोनाने व्यापारी क्षेत्राला मोठा दणका दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी देशातील विविध राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारातील मागणीत घट झाली आहे.

जानेवारीपर्यंत दररोज 15 हजार कोटी स्थानिक व्यापार व्हायचा. यात घट झाली असून हा व्यापार 9 हजार कोटींपर्यंत घसरला आहे. आगामी दिवसात यात आणखी घट होईल, असा अंदाजही प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केलाय. 

काँग्रेस आमदारांच्या अनुपस्थितीत शिवराजसिंह चौहानांनी सिद्ध केलं बहुमत

कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाला, फळे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ होण्याचा अंदाज ओनियन मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी व्यक्त केलाय. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा कार्यरत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.