पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त

तांदूळ आणि डाळीच्या किमती वाढल्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या लॉकडाऊनमुळे डाळ, तांदूळ, तेल आणि मीठाच्या किमती वाढल्या आहेत. तर भाजीपाल्याच्या किमतीमध्ये घट झाली आहे. बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ ही सरकारी आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.

चीनमुळे आज १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागताहेत - डोनाल्ड ट्रम्प

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गहू, तांदूळ, डाळी, तेल, साखर आणि चहाच्या किमती वाढल्या आहेत. ही वाढ लॉकडाऊनमुळे झाली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. ईशान्य भारतात तांदळाच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तर दिल्लीमध्ये हरभऱ्याच्या डाळीच्या किमतीमध्ये १४ रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. 

राज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

लॉकडाऊनची सुरुवात झाली त्यावेळी डाळ ७२ रुपये प्रतिकिलो होती. तर २८ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, डाळीची किंमत ८६ रुपयांवर पोहचली आहे. तूर डाळींच्या किमती देखील वाढल्या आहेत. मंत्रालयाच्या  किंमत देखरेख विभागाच्या आकडेवारीनुसार असे दिसून येते की, दिल्लीत तूर डाळीची किंमत १३ रुपयांनी आणि तेलंगणामध्ये ३० रुपये प्रति किलो दराने वाढल्या आहेत. मसूर डाळीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये १० रुपये, गुरुग्राममध्ये २० रुपये आणि मुंबईमध्ये ३३ रुपये प्रति किलो दराने वाढ झाली आहे. 

केदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच

दरम्यान, तेलाच्या दरात देखील वाढ झाली आहे. गुरुग्राममध्ये मोहरीच्या तेलामध्ये २० रुपये प्रतिलिटर दराने वाढ झाली आहे. करनूलमध्ये १७० रुपयांवर मोहरीच्या तेलाचे दर पोहचले आहेत. गुरुग्राममध्ये वनस्पती तेलाच्या किमतीत १६ रुपये आणि गुवाहाटीमध्ये २० रुपये दराने वाढ झाली आहे. गुरुग्रामध्ये दुधाच्या दरात १४ रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये मीठाच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. 

अमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू