पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: आर्थिक अडचणीत करदात्यांना मोठा दिलासा!

प्राप्तिकर विभाग

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक कठोर पावले उचलण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा देखील त्याचाच एक भाग आहे. देशव्यापी लॉकडाऊनाच कालावधी एप्रिलच्या अखेरपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा देशातील अर्थकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे. 

 

मुंबईकरांनो मास्क वापरा, अन्यथा अटकेची कारवाई होईल!

कोरोनाचा सामना करत असताना निर्माण होणारे आर्थिक संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व व्यावसायिक संस्था तसेच व्यक्तींच्या पाच लाखापर्यंतच्या प्राप्तिकर परतावा त्वरित देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यासोबतच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परताव्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.  

लॉकडाऊन १४ एप्रिलला संपवणे अशक्य, नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयानंतर  करदात्यांना जवळपास अठरा हजार कोटी रुपये परतावा देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत पाच हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत जवळपास दिडशे लोकांनी या साथीच्या महारोगामुळे जीव गमावला आहे.