पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात कपात, सीतारामन यांची घोषणा

निर्मला सीतारामन

अर्थव्यवस्थेतील मरगळ घालविण्यासाठी आणि आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी आणखी काही नव्या घोषणा केल्या. देशातील कंपन्यांसाठी आणि देशांतर्गत उत्पादन करणाऱ्या कंपन्यासाठीच्या कॉर्पोरेट करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयाचे तात्काळ शेअर बाजारात पडसाद उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी ८२८ अशांनी उसळला.

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रश्न समजून घेऊन त्यानुसार त्यावर उपाययोजन केली जात आहे. याच कडीमध्ये शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी नवी घोषणा केली. 

महत्त्वाच्या घोषणा

मेक इन इंडियाला आणखी बळ देण्यासाठी १ ऑक्टोबर २०१९ या दिवशी किंवा त्यानंतर स्थापन झालेल्या कंपन्यांनी उत्पादन क्षेत्रावर गुंतवणूक केली असेल तर त्यांना १५ टक्क्याने प्राप्तिकर भरण्याची सवलत देण्यात येईल.

विकासाला चालना देण्यासाठी आणखी प्राप्तिकर कायद्यात एक नवी तरतूद करण्यात आली आहे. या प्रमाणे चालू आर्थिक वर्षापासून देशांतर्गत कोणतीही कंपनी २२ टक्क्याने प्राप्तिकर भरू शकते. फक्य या स्थितीत संबंधित कंपनीला इतर सवलती घेता येणार नाहीत.

मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्सच्या (मॅट) दरात १८.५ टक्क्यावरून १५ टक्के इतकी कपात करण्यात आली आहे.