पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी SBI कर्मचाऱ्यांकडून १०० कोटींची मदत

एसबीआय (संग्रहित छायाचित्र)

कोरोनाविरोधातील लढाईसाठी सर्वांकडूनच मदतीचा हात पुढे येत आहे. देशभरातील अनेक उद्योजक, सेलिब्रिटी, राजकीय नेते यांच्यासह सर्वसामान्य नागरिक कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी देखील या लढाईसाठी १०० कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोनाविरोधातील लढाईसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशभरातील जवळपास २ लाख ५६ हजार कर्मचारी आपला दोन दिवसांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणाऱ्या मदत निधीतून पंतप्रधान सहाय्यता निधीला १०० कोटीची मदत होणार आहे.' 

COVID 19: वर्षभराचा पगार सरकारला देणार, जितेंद्र आव्हाडांचा निर्णय

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे करत कोट्यवधींची मदत केली आहे. रिलायन्स ग्रुपने ५०० कोटींची, टाटा ट्रस्टने ५०० कोटी मदत केली आहे. 

लॉकडाऊनः व्होडाफोनकडून ग्राहकांना फ्री टॉकटाइम

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus state bank of india employees have decided to contribute two days salary to the pms national relief fund