पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्पाइसजेटच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्क्यांची कपात

स्पाइसजेट

देशातील विमान कंपनी स्पाइसजेट मार्च महिन्यात आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्क्यांची कपात करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष अजय सिंह यांना मिळणाऱ्या वेतनात सर्वांधिक ३० टक्के कपात होणार आहे. कंपनीने मंगळवारी सर्वांना एक ई-मेल पाठवला आहे. त्यात याबाबत माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, स्पाइसजेट व्यवस्थापनाने मार्चमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी (अजय सिंह) ३० टक्क्यांची सर्वाधिक कपातीचा पर्याय निवडला आहे. दुसऱ्या विमान कंपन्या इंडिगो आणि गोएअरने यापूर्वीच अशाच पद्धतीचा निर्णय घेतला आहे. 

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त, १८ वर्षांच्या नीचांकावर

ई-मेल मध्ये म्हटले आहे की, हा खूप कठीण काळ आहे आणि असाधारण आव्हानांसाठी योग्य उपायांची गरज आहे. बहुतांश भारतीय विमान कंपन्यांनी या आधीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याची घोषणा केली आहे. 

कोरोनाशी लढ्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये, ५०० कंपन्यांची निवड पूर्ण

दुर्भाग्याने स्पाइसजेट या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्त सक्षम नाही. जगभरातील विमान कंपन्यांची स्थिती गंभीररित्या यामुळे प्रभावित झाली आहे, असेही यामेलमध्ये म्हटले आहे. या कठीण स्थितीत नाईलाजाने कंपनीला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. या कठीण स्थिताच सामना करण्यासाठी तुमची मदत मिळेल.

मुदत संपलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus side effects SpiceJet to cut salaries of all employees by 10 to 30 percent in March 2020