पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअर एशिया १५ एप्रिलपासूनचे तिकीट बुकिंग सुरु करणार

एअर एशिया (संग्रहित छायाचित्र)

स्वस्त विमानसेवा देणाऱ्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या एअर एशिया इंडियाने १५ एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु केले आहे. जोपर्यंत डीजीसीएडून याबाबत येणाऱ्या दिशा निर्देशावर अवलंबून असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणास १४ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 

पुण्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, बाधितांचा आकडा ६६१ वर

त्यामुळे बहुतांश विमा कंपन्यांनी १५ एप्रिलनंतरचे बुकिंग सुरु केले आहे. दरम्यान, शुक्रवारी एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत बुकिंग न करण्याची घोषणा केली होती. एअर एशियाने पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, प्रवासी १५ एप्रिलनंतर आपले तिकीट बुक करु शकतील. पण डीजीसीएच्या सूचनेनंतर यात बदल होऊ शकतो. नागरी हवाई उड्डाण सचिव प्रदीपसिंह खरोला यांनी विमान कंपन्या १४ एप्रिलनंतर तिकीट बुक करु शकतील असे म्हटले होते. 

लॉकडाऊन काळातही भाजप आमदाराकडून विठ्ठल-रक्मिणीची महापूजा

लॉकडाऊनदरम्यान विमान कंपन्यांची नजर सरकारच्या निर्णयावर टिकून आहे. कारण १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार की नाही हे सरकारवर अवलंबून आहे. त्यामुळेच कंपन्यांना डीजीसीएच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत देशात विमान, रेल्वे, मेट्रो, बस आणि टॅक्सीसह इतर वाहतूक सुविधा बंद आहेत.