पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना व्हायरसमुळे ऍपल ग्राहकांना वेगळाच फटका

आयफोन

कोरोना व्हायरसच्या चीनमधील फैलावामुळे ऍपलच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऍपल कंपनीकडून आपल्या विक्रेत्यांना काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. 

वृत्तपत्रात एक जाहिरात आली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ऍपलच्या उत्पादनांची निर्मिती मोठ्या प्रमाणात चीनमध्येच होते. भारतातही चीनमध्ये निर्मित झालेली ऍपलची उत्पादने मिळतात. पण चीनमधील परिस्थितीमुळे ऍपल उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसते आहे. कंपनीने आपल्या वितरकांना दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पर्यायी (रिप्लेसमेंट) आयफोनचा पुरवठा कमीच राहण्याची शक्यता आहे. कोणताही आयफोन नादुरुस्त झाल्यानंतर तो दुरुस्त होईपर्यंत संबंधित ग्राहकाला पर्यायी आयफोन दिला जातो. आता त्याचा पुरवठा कमी होण्याचे ऍपलने म्हटले आहे. 

दरम्यान, काही विक्रेत्यांकडे ऍपलची उत्पादने आणि इतर सुटे भाग यांचीही उपलब्धता कमी असल्याची माहिती मिळाली आहे. अर्थात कंपनीकडून याला दुजोरा मिळालेला नाही. 

गाण्याचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून कुऱ्हाडीने हल्ला

चीनमधील कोरोना व्हायरसच्या फैलावानंतर पहिल्यांदाच पर्यायी आयफोनच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पण ही सुरुवात आहे. काही वृत्तांनुसार, चीनमधील परिस्थितीमुळे आयपॅड प्रो आणि आयफोन ११ यांच्या पुरवठ्यावरही जागतिक पातळीवर परिणाम झाला आहे. या उत्पादनांची संख्या मागणीपेक्षा कमीच आहे.