पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनः व्होडाफोनकडून ग्राहकांना फ्री टॉकटाइम

व्होडाफोन-आयडिया

एअरटेल आणि बीएसएनएलनंतर टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाही आता आपल्या ग्राहकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे व्होडाफोनने कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोनने आपल्या सर्व प्रीपेड प्लॅनचा व्हॅलिडिटी वाढवली आहे. त्याचबरोबर मोफत टॉकटाइमचीही ऑफर देण्यात आली आहे.

लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

कंपनीने सर्व प्रीपेड प्लॅनची वैधता १७ एप्रिल २०२० पर्यंत वाढवली आहे. प्लॅनची व्हॅलि़डिटी वाढवल्यामुळे व्होडाफोन आणि आयडियाच्या लाखो फोन युजर्सचा प्लॅन संपत आला तरी त्यांना इनकमिंग कॉलची सुविधा मिळत राहिल. 

त्याचबरोबर कंपनीने आपल्या सर्व सुमारे १० कोटी फिचर फोन युजर्सच्या अकाऊंटमध्ये १० रुपयांचा टॉकटाइमही दिला आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपले ग्राहक आपले मित्र आणि कुटुंबीयांबरोबर कॉल आणि एसएमएसच्या माध्यमातून संपर्कात राहावेत यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त, १८ वर्षांच्या नीचांकावर

या अडचणीच्या काळात आमचे ग्राहक विना व्यत्यय चिंतेशिवाय संपर्कात राहिले पाहिजेत. याचा सर्वाधिक फायदा मजूर आणि कामगार वर्गाला होईल, असे कंपनीने म्हटले आहे. 

दरम्यान, एअरटेलनेही कमी उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी प्रीपेड प्लॅनची वैधता १७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. व्हॅलिडिटी संपल्यानंतरही एअरटेल नंबरवर इनकमिंगची सुविधा मिळत राहिल.

स्पाइसजेटच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्क्यांची कपात