पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची दहशत: कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे ट्विटरचे निर्देश

ट्विटर

वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. कोरोनाच्या भितीने ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. त्याचसोबत टीसीएस आणि एचसीएल सारख्या आयटी कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश दिले आहेत. 

कोरोनाच्या प्रकोपामुळे पॅरासिटमॉलसह अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी

ट्विटरच्या पीपल्स टीमच्या प्रमुख जेनिफर क्रिस्टी यांनी भारतासह सर्वच देशातील आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम  करण्याचा पर्याय दिला आहे. तर आयटी कंपनी टीसीएसने सांगितले की, कंपनी या संदर्भात सर्व जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक आरोग्य संस्थांसोबत काम करत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने इटलीमधील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. तसंच त्यांनी कर्मचार्‍यांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. 

खासगीकरणाच्या निर्णयानंतर एअर इंडियातील वैमानिकांची गळती, ६५ जणांचे राजीनामे

तर दुसरीकडे, एचसीएलने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. एचसीएलने सांगितले की, त्यांनी बाधित देशांमध्ये आपत्ती बचाव योजना लागू केल्या आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांना प्रवासाबाबत समुपदेशनही देण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ३,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये सुद्धा कोरोनाचे ६ रुग्ण आढळले आहेत. 

भाजपने ८ आमदारांना बळजबरीने हॉटेलवर ठेवले, काँग्रेसचा आरोप