पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा परिणाम: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोने-चांदींच्या दरात घसरण

वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरात व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे शेअर बाजारात पडझड सुरु आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. असे असताना आता सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले. इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १० ग्रॅम सोन्याच्या दरात २०२२ रुपयांनी घसरण होत सोने ३९,९९५ रुपयांवर आले. तर चांदीच्या दरात प्रति किलो ६ हजार ४४५ रुपयांनी घसरण झाली. 

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू

कोरोना विषाणूचा प्रभाव सराफ बाजारावर झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये घससरण सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा मंगळवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. सोन्याच्या दरात ११.९५ डॉलरने घकरण होत १५०२.१५ डॉलर प्रति औंस झाले. तर चांदीच्या दरात घसरण होत ते १२.९१ डॉलर प्रति औंस झाले. दरम्यान, १३ मार्चला देखील सोन्याच्या दरात घसरण होत सोन्याचे दर ४१,५५६ रुपयांवर आले होते. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. 

कोरोनाचे साईड इफेक्ट्स, चीनमध्ये घटस्फोटांच्या संख्येत वाढ

आठवडाभरात सोन्याच्या दरात झालेली घसरण - 

९ मार्च - ४४ हजार ०१४
११ मार्च - ४३ हजार ६४८
१२ मार्च - ४३ हजार ३७४
१३ मार्च - ४२ हजार ०१७
१६ मार्च - ३९ हजार ९९५
१७ मार्च - ४० हजार १९५

आठवडाभरात चांदीच्या दरात झालेली घसरण - 

९ मार्च - ४६ हजार ००५
११ मार्च - ४६ हजार ००५
१२ मार्च - ४५ हजार ३४०
१३ मार्च - ४३ हजार ०८५
१६ मार्च - ३६ हजार ६४०
१७ मार्च - ३६ हजार १२५