पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना इफेक्ट: पेट्रोल आणखी ४ रुपयांनी स्वस्त होणार

पेट्रोलचे दर कमी होणार

चीनमध्ये पसरलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. या विषाणूमुळे कच्च्या तेलाची मागणी खूप कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत कच्च्या तेलाच्या जागतिक वापरामध्ये ४.३५ लाख बॅरल घट होऊ शकते. मागणीमध्ये घट झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरामध्ये सुध्दा घट होईल. 

हेरगिरी प्रकरणी नौदलाच्या ११ कर्मचाऱ्यांना अटक

ऊर्जा विशेषतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, याचा फायदा भारतीय उपभोक्तांना होईल. भारतामध्ये गेल्या एका महिन्यामध्ये पेट्रोलचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहे. तर पुढच्या दोन आठवड्यामध्ये पेट्रोलचे दर आणखी चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. जेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (ऊर्जा व चलन) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, 'कोरोना विषाणूमुळे कच्च्या तेलाचे दरात मोठी घट झाली आहे. कच्च्या तेलाचे दर ५६ डॉलर प्रति बॅलरवरुन ५० डॉलरवर आले आहे.' 

भगवान रामही भाजपची मदत करु शकले नाहीत, संजय राऊत यांचा टोला

अनुज गुप्ता यांनी पुढे सांगितले की, 'न्यूयॉर्कमध्ये मर्केंटाईल एक्सचेंज (नायमॅक्स) वर अमेरिकी कच्च्या तेलाचे दर ५२.२३ डॉलर प्रति बॅलरवरुन ४८ डॉलर प्रति बॅलरवर आले आहे. याचा सर्वात जास्त फायदा भारतीय तेल बाजाराला झाला. येत्या दोन आठवड्यात पेट्रोलच्या दरात चार रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते. तसंच डिझेलचे दर सुद्धा कमी होऊ शकतात.' 

कोरोनापुढे चीन सरकार हतबल, आतापर्यंत १,७६५ नागरिकांचा मृत्यू