पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ग्राहकाला BMW कार बदलून देण्याचे राष्ट्रीय ग्राहक हक्क आयोगाचे आदेश

बीएमडब्लू कार (संग्रहित छायाचित्र)

दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक हक्क आयोगाने जर्मनीतील बीएमडब्ल्यू कंपनीला एका ग्राहकाला त्याची बीएमडब्लू कार बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. या ग्राहकाच्या कारला अपघातात मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही गाडी बदलून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बजाज अलियान्झ विमा कंपनी आणि बीएमडब्लू या दोघांना दिल्लीतील रहिवासी मुकुल आगरवाल यांना त्यांची अपघातग्रस्त कार बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. 

कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन कायद्यांवर फोकस

मुकुल आगरवाल यांच्या कारला बीएमडब्लू कंपनीचे सुरक्षा कवच होते. या कवचानुसार ज्या गाडीला असे कवच असते तिला जर मोठे नुकसान झाले तर संबंधित ग्राहकाला संपूर्ण कार बदलून दिली जाते. गाडीचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कंपनीला मिळाल्यानंतर संबंधित ग्राहकाला जुन्या गाडीच्या बदल्यात नवी कार उपलब्ध करून दिली जाते. ग्राहक आयोगाने मुकुल आगरवाल यांना संबंधित गाडीच्या नोंदणीसाठी, परिवहन विभागाचा कर भरण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी जो खर्च आला आहे. तो सुद्धा भरून देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीवरील सुनावणी पुढे ढकलली

राष्ट्रीय ग्राहक आयोगाने या संदर्भात राज्य ग्राहक आयोगाचा निकाल कायम ठेवला आहे. राज्य ग्राहक आयोगाच्या निकालाविरोधात बीएमडब्लू आणि बजाज अलियान्झ विमा कंपनीने राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.