पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट शिथिल, ATM लाही दिलासा

निर्मला सीतारामन

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशापुढे उभ्या राहिलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये त्यांनी पुढील तीन महिन्यांसाठी बँकांतील बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट शिथिल केल्याचे जाहीर केले. बचत खात्यात किमान शिल्लक नाही म्हणून जून २०२० पर्यंत बँकांना खातेदारांकडून कोणताही दंड वसुल करता येणार नाही, यामुळे बँक खातेदारांना दिलासा मिळाला.

यंदाचा गुढीपाडवा घरातच साजरा करा, उपमुख्यमंत्री, राज्यपालांचे आवाहन

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. दळणवळणाची साधनेही बंद ठेवण्यात आली आहेत. या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. आधीच मंदीच्या स्थितीतून देश जात आहे. त्यातच कोरोना विषाणूमुळे नवे आव्हान उभे राहिले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही घोषणा केल्या.

त्या म्हणाल्या, पाच कोटींवर आर्थिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना त्यांचे वस्तू व सेवा कर विवरणपत्र उशीरा भरले म्हणून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर टॅक्स डिडक्ट ऍट सोर्सची (टीडीएस) रक्कम उशिराने भरल्यास तूर्त १८ टक्क्यांऐवजी केवळ ९ टक्केच व्याज आकारले जाईल. 

एक कोरोनाबाधित रुग्ण कमाल चार जणांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो, संशोधन

आपल्या बँकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून डेबिट कार्डच्या साह्याने पैसे काढल्यास कोणतेही शुल्क तीन महिन्यांसाठी आकारले जाणार नाही. त्याचबरोबर महिन्यातून चारपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यासही कोणताही दंड आकारला जाणार नाही. येत्या एप्रिल अखेरपर्यंत काय परिस्थिती राहते हे पाहून सरकार पुढील निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Complete waiver of minimum balance charges for savings bank account says FM Nirmala Sitharaman