पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडिगो विमान कंपनीचा कतार एअरवेजसोबत करार

इंडिगो विमान कंपनीचा मोठा निर्णय

प्रवासी संख्या सर्वाधिक असण्याच्या यादीत आघाडीवर असलेल्या इंडिगो विमान कंपनीने कतारच्या सरकारी एअरवेजसोबत कोड शेअर समझोता केला आहे. या निर्णयामुळे कतारची राजधानी दोहाच्या आतंरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्ली, मुंबई आणि हैदराबादच्या दिशेने उड्डाण भरणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे तिकीट बुक करणे सहज शक्य होईल.  

 

इन्फोसिस कंपनी १० टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ

कतार एअरवेज समूहाचे मुख्य कार्यकारी अकबर अल बकर आणि इंडिगोचे मुख्यकार्यकारी अधिकाकारी रोनोजॉय दत्ता यांनी एका कार्यक्रमात कोड शेअर दस्ताएवजावर स्वाक्षऱ्या केल्या.  या करारानंतर बकर म्हणाले की, स्वस्त विमान सेवा देणाऱ्या इंडिगोच्या यात्रेकरुंना यापुढे कतारच्या सरकारी विमान सेवेच्या सुविधांचाही लाभ घेता येईल.  कतारमध्ये विमान सेवेचा वापर करणाऱ्यांमध्ये २२ टक्के यात्रेकरु हे भारतीय असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.  

PMC बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये आणखी वाढ

इंडिगो विमान कंपनीचे दत्ता म्हणाले की, कतार एअरवेज आणि इंडिगो यांच्यातील व्यापार संबंधाची ही सुरुवात आहे. भविष्यात प्रवासांच्या हितासंदर्भात एकत्रित मिळून चांगल्या स्वरुपात सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.