पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ट्रायनं ग्राहकांना त्रासदायक कॉलच्या नव्या नियमांची माहिती द्यावी'

त्रासदायक कॉलसंदर्भातील योग्य माहितीसह ग्राहकांमध्ये जागृकता करण्याची गरज

दूरसंचार सेवेचे नेतृत्व करणाऱ्या 'सेल्युलर ऑपरेटर्स असोशिएशन ऑफ इंडिया'ने (सीओएआय) ग्राहकांसाठी त्रासदायक कॉल आणि संदेशसंदर्भात महत्वपूर्ण भूमिका मांडली आहे. यातील कार्यप्रणालीची आणि नव्या नियमांसंदर्भात ग्राहकांना योग्य ती माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) केली आहे. सीओएआयने म्हटलंय की, मोबाईल दूरसंचार सेवेतील कंपन्या आपल्या ग्राहकांकडून यासंदर्भात मिळणाऱ्या तक्रारीचा मासिक अहवाल लवकरच सादर करणार आहेत.

WIvsIND 3rd ODI : कॅरेबिन बेटावर डौलात फडकला तिरंगा

पीटीआयच्या वृत्तानुसार, सीओएआयचे महासचिव राजन मॅथ्यू म्हणाले की, ग्राहकांना त्रासदायक कॉल आणि संदेश संदर्भात ट्रायने जागृकता अभियान राबवण्याची गरज आहे. यासंदर्भात ट्रायने ६ ऑगस्ट रोहजी मोबाईल दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून त्रासदायक कॉल आणि संदेशासंदर्भातील तक्रारीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हा अहवाल सप्टेंबरपर्यंत सादर करायचा आहे. या अहवालाच्या माध्यमातून  नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.  मॅथ्यूज पुढे म्हणाले की, 'डू नॉट डिस्टर्ब' व्यवस्था कार्यप्रणालीबद्दल ग्राहकांना माहिती असणे गरजेचे आहे. यासंदर्भात तक्रार देण्याबाबतही ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. 

सर्व सार्वजनिक बँका सकाळी ९ वाजता उघडणार