पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनला धक्का, ३० वर्षांनंतर प्रथमच जीडीपीत घट

चीनला धक्का, ३० वर्षांनंतर सर्वांत कमी जीडीपी

अमेरिकेने उत्पादनांवर वाढवलेले शूल्क आणि व्यवसायावर झालेल्या परिणामांदरम्यान चीनसाठी आर्थिक आघाडीवरही वाईट बातमी आली आहे. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा आर्थिक विकास मागील तीन दशकात प्रथमच मंदावला आहे. दुसऱ्या तिमाहीत त्यांचा आर्थिक विकास मागील ३० वर्षांतील सर्वांत कमी वेगाने वाढल्याची माहिती चीननेच सोमवारी दिली आहे. 

राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या हवाल्याने चिनी दैनिक 'साउथ चीन'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, देशाच्या जीडीपीची (सकल राष्ट्रीय उत्पन्न) पहिल्या तिमाहीतील वाढ ६.४ टक्क्यांवरुन घटून एप्रिल-जूनच्या दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्क्यांवर आली आहे. 

चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसल्याचे वृत्त लष्कराने फेटाळले

चीनचे पंतप्रधान लि कियांग यांनी मार्चमध्ये देशाच्या आर्थिक विकासाचे लक्ष्य ६ ते ६.५ टक्के निश्चित केले होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी ही वर्तवलेल्या अंदाजानुसार आहे. 

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनदरम्यान मे मध्ये व्यापार विषयक बैठक फिस्कटल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर वाढवलेल्या शूल्कानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेवरील ग्राहकांचा विश्वास घटला आहे. गत शुक्रवारी चिनी सरकारने त्यांची निर्यात १.२ टक्क्यांनी घटल्याचे जाहीर केले होते.

... या क्षेत्रात २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकणार