पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBIची दणदणीत ऑफर, गृहकर्ज हवे असेल तर लगेच अर्ज करा

स्टेट बँक

जर तुम्हाला स्वस्तात गृहकर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने गृह कर्जासाठी नवी योजना आणली आहे. या योजनेनुसार ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना सामान्य व्याजदरापेक्षा ०.२५ टक्के कमी व्याज द्यावे लागेल. स्टेट बँकेकडून ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली.

मेरठ पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीचा भाजपवर निशाणा

स्टेट बँकेने केलेल्या ट्विटनुसार, स्टेट बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर ८.१५ टक्क्याने सुरू होते. पण या ऑफरनुसार ग्राहकांना वर्षाला ७.९० टक्क्याने गृहकर्ज मिळेल. अर्थात या व्याजदराने गृहकर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर बँकेचे गृहकर्जाचे सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहे. १ जानेवारी २०२० पासून हे नवे व्याजदर ग्राहकांना मिळू शकेल.

इंटरनेट बंद ठेवल्याने तासाला किती कोटींचे नुकसान होते माहितीये?

या योजनेतील व्याजदराने गृहकर्ज घेण्यासाठी ग्राहकांना YONOSBI या ऍपच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. बँकेकडून तुमचा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला तत्त्वतः मंजुरी दिली जाईल. या योजनेमध्ये गृहकर्जाचे प्रक्रिया शुल्कही कमी असणार आहे. त्याचबरोबर कोणतेही छुपे शुल्क असणार नाही. लोनच्या मुदतपूर्व मुद्दल जमा करण्यावर (प्रीपेमेंट) कोणतेही शुल्क वसुल केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cheapest home loan apply before december 31st 2019 sbi home loan lower interest rate from 1st january 2020