पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'एक देश, एकाच दिवशी वेतन' व्यवस्था लवकरच देशात लागू

एक देश, एकाच दिवशी वेतन व्यवस्था लवकरच लागू होईल.

संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हिताचा व्यापक विचार करून केंद्र सरकारकडून 'एक देश, एकाच दिवशी वेतन' योजना राबविण्याचे नियोजन केले जात आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी शुक्रवारी याबद्दल माहिती दिली.

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाहीः संजय राऊत

कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन देशभरात एकाच दिवशी मिळाले पाहिजे. त्यासाठीच कायदा करण्याचे सरकारने ठरविले आहे. या संदर्भातील विधेयकासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त उत्सुक आहेत. त्यामुळे लवकरच हे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले जाईल. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी किमान वेतन निश्चित करण्यावरही केंद्र सरकारकडून विचार केला जातो आहे, असे संतोष गंगवार यांनी सांगितले.

खासगी सुरक्षारक्षकांच्या देश पातळीवरील संघटनेने आयोजित केलेल्या एका परिषदेमध्ये बोलताना संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. व्यवसाय किंवा नोकरीतील सुरक्षितता, आरोग्य, काम करण्याची आदर्श संहिता आणि वेतन संहिता यांची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. संसदेने वेतन संहिता विधेयक आधीच मंजूर केले आहे. त्यातील नियम तयार करण्यात आले असून, लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अयोध्यावर निर्णय देणाऱ्या सरन्यायाधीश गोगोईंना झेड प्लस सुरक्षा

२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून कामगार कायद्यामध्ये सातत्याने आवश्यक सुधारणा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार प्रयत्नशील आहे, असेही संतोष गंगवार यांनी सांगितले.