पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! बँक ठेवींवरील १ लाखाच्या विम्यामध्ये लवकरच वाढीची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

ग्राहकांनी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवीवर सध्या एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. या रकमेमध्ये वाढ करण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जातो आहे. त्याचबरोबर यामध्येही ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. केंद्र सरकार सर्व ठेवीदारांच्या हिताचा विचार करण्यासाठी देशातील सर्व आर्थिक संस्था, कंपन्या या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारित आणण्याचाही निर्णय घेऊ शकते.

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच पंजाब एँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. या बँकेतून ५० हजार रुपयेच काढण्याचे बंधन सध्या घालण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या सुरुवातीला बँकेमध्ये ११ हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यामध्ये प्रत्येक ठेवीदाराला विमा नियमानुसार १ लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळाले आहे. 

सरकारच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, ठेवीदारांना मिळणाऱ्या विमा संरक्षणाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये विविध मुद्द्याचा अंतर्भाव आहे. त्यापैकी एक म्हणजे विम्याची रक्कम सध्याच्या एक लाख रुपयांवरून वाढविण्यावरही विचार सुरू आहे. सुरुवातीला ठेवीदारांना त्यांच्या बँकेतील ठेवींवर ३० हजार रुपयांचे विमा संरक्षण होते. त्यामध्ये एक लाख रुपयांपर्यंत १९९३ मध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत या रकमेमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

सत्ता संघर्ष: राज्यपालांकडून सेनेला निमंत्रण, पण...

विमा संरक्षणासाठी बँकांकडून भरल्या जाणाऱ्या प्रिमियमच्या रचनेमध्येही बदल करण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने प्रिमियम आकारला जातो. त्यामध्येही बदल होणार आहे.