पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NRC, NPR नंतर आता NBRवर सरकारचा विचार सुरु

संग्रहित छायाचित्र

सरकार एक नॅशनल स्टॅ्टस्टिकल बिझनेस रजिस्टर तयार करण्याची योजना आखत आहे. सातव्या आर्थिक जनगणनेच्या परिणामाच्या आधारावर देशातील यामध्ये सर्व लहान-मोठ्या व्यवसायाची माहिती असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

या रजिस्टरमध्ये माल, सेवेचे उत्पादन/ वितरणातील सर्व व्यावसायिक शाखा आणि संस्थांची जिल्हावार माहिती असेल. या रजिस्टरला जीएसटी नेटवर्क, कर्मचारी राज्य विमा मंडळ, कर्मचारी भविष्य निधी संघटन आणि कंपनी प्रकरणांच्या मंत्रालयातून मिळणाऱ्या आकड्यांतून नियमितपणे अपडेट केले जाईल. 

फोन टॅप प्रकरण : इस्रायला जाऊन चौकशी केली तरी हरकत नाही 

जणगणनेनुसार या रजिस्टरचा फ्रेमवर्क तयार करण्यास मदत मिळेल. जीएसटीएन सारख्या सरकारी विभागांच्या डेटाच्या आधारे तो सातत्याने अपडेट केला जाऊ शकेल. 

'...कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'

या रजिस्टरमध्ये जमा केलेल्या आकड्यांमुळे नॅशनल अकाउंट्सच्या गुणवत्तेत सुधारणा आणता येईल. रजिस्टर सेवा क्षेत्राच्या प्रस्तावित वार्षिक सर्वेक्षणासाठी इनपुट उपलब्ध करेल. यामुळे सेवा क्षेत्राची सविस्तर माहिती उपलब्ध होईल. अधिकाऱ्याने सांगितले की, सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय आर्थिक कामकाजाच्या अचूक आकलनासाठी, असे रजिस्टर बनवू इच्छित आहे. त्यात सर्व व्यावसायिक शाखा- संस्थांची माहिती एका ठिकाणी मिळेल. त्यासाठी अर्थ मंत्रालयाशी याआधी संपर्क साधण्यात आला आहे.