पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हजारो कोटींच्या बॅंक घोटाळ्यांच्या प्रकरणात CBI कडून १६९ ठिकाणी छापे

सीबीआयकडून छापे

बॅंकांतील आर्थिक घोटाळ्यांच्या विविध प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) मंगळवारी दिल्ली, चंदीगढ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये एकूण १६९ ठिकाणी छापे टाकण्यात आले. सात हजार कोटींच्या बॅँक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये एकूण ३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आता रडायचं नाही तर लढायचं; उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दादरा नगर हवेली या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. रोझव्हॅली घोटाळ्या प्रकरणी बंदरे विभागाचे उपायुक्त वकार रजा यांची सोमवारीच चौकशी करण्यात आली होती. रोझव्हॅली समूहाने आर्थिक गैरव्यवहार केले त्यावेळी सीआयडीचे अधिकारी म्हणून वकार रजा यांची काय भूमिका होती, हे समजून घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली, असे सीबीआयकडून सांगण्यात आले.