पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोबाइल यूजर्सला मोठा झटका, डिसेंबरपासून बोलणं महाग होणार

मोबाइल यूजर्सला मोठा झटका, डिसेंबरपासून बोलणं महाग होणार

जर तुम्ही व्होडाफोन-आयडिया किंवा एअरटेलचे ग्राहक असाल तर एक डिसेंबर २०१९ पासून मोबाइलवर बोलण्यासाठी जास्त खर्च करावे लागतील. मोबाइल कंपन्यांनी सोमवारी ही घोषणा केली. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने एक डिसेंबरपासून मोबाइल सेवांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोन्ही कंपन्यांनी सध्या तरी प्रस्तावित शूल्क वाढीशी निगडित माहिती दिलेली नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात जिओ ग्राहकांनाही यावर अधिक खर्च करावा लागेल.

रामदास आठवलेंनी शिवसेनेचे टेन्शन घेऊ नये, संजय राऊतांचा टोला

त्यामुळे कॉल जोडण्याचे शूल्क (आययूसी) बंद होणार नाही. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) या वादग्रस्त मुद्द्यावर या महिनाअखेर आपले मत देण्याची आशा आहे. व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलच्या विरोधामुळे हे शूल्क कायम राहण्याची शक्यता आहे. 

तर रिलायन्स जिओने आययूसी शूल्क संपवण्याची तारीख एक जानेवारीच्या पुढे ढकलली तर निशूल्क व्हाईस कॉल्सचे युग संपेल आणि शूल्क दरांत वाढ होऊ शकते, असे म्हटले आहे. 

चुकून सीमा ओलांडून गेलेल्या भारतीयांवरून पाकचे 'नापाक' राजकारण

दरम्यान, व्होडाफोन-आयडियाला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ५०,९२२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एखाद्या भारतीय कंपनीचा एका तिमाहीतील हे सर्वांत मोठे नुकसान आहे. एअरटेलला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २३,०४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.