पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्कोडा कंपनीच्या 'या' गाड्यांवर घसघशीत सूट, जाणून घ्या किंमत

स्कोडा कंपनीच्या कार

१ एप्रिल २०२० पासून भारत स्टेज ६ (बीएस ६) प्रदूषण निकष भारतात लागू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वच कंपन्या आपल्या उर्वरित राहिलेल्या भारत स्टेज ४ (बीएस ४) च्या गाड्या निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर देत आहेत. मारुती, टाटा, आणि महिंद्रा कंपनीनंतर आता स्कोडा इंडिया कंपनीने सुध्दा आपल्या बीएस ४ कारवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. 

लक्ष देऊन ऐका!, जुन्या डेबिट कार्डनेही होऊ शकते फसवणूक

कार देखोने दिलेल्या माहितीनुसार, स्कोडाच्या कोणत्या मॉडेल्समध्ये किती सूट मिळत आहे. ते खालीलप्रमाणे...

- एम्बिशन एटी कारची आधीची किंमत ११.३५ लाख एवढी होती. या कारवर १.३६ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत ९.९९ लाख झाली आहे.

- एक्टिव कारची आधीची किंमत १०.०६ लाख एवढी होती. या कारवर १.०७ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत १०.०६ लाख झाली आहे. 

- एम्बिशन कारची आधीची किंमत ११.२९ लाख एवढी होती. या कारवर १.३ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत ९.९९ लाख झाली आहे. 

- स्टाइल कारची आधीची किंमत १२.७३ लाख एवढी होती. या कारवर १.५८ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत ११.१५ लाख झाली आहे. 

- मोंटे कार्लो कारची आधीची किंमत १२.९९ लाख एवढी होती. या कारवर १.६ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत ११.३९ लाख झाली आहे.  

- एम्बिशन एटी कारची आधीची किंमत १२.४९ लाख एवढी होती. या कारवर १.१४ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत ११.३५ लाख झाली आहे. 

- स्टाइल एटी कारची आधीची किंमत १३.९९ लाख एवढी होती. या कारवर १.५६ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत १२.४३ लाख झाली आहे. 

- मोंटे कार्लो कारची आधीची किंमत १४.२५ लाख एवढी होती. या कारवर १.५६ लाखांची सूट देण्यात आली आहे. आता या कारची किंमत १२.६९ लाख झाली आहे.