पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2020: परवडणारी घरे देणाऱ्या बांधकाम विकसकांना एक वर्षाची 'कर विश्रांती'

परवडणारी घरे देणाऱ्या बांधकाम विकसकांना एक वर्षाची 'कर विश्रांती'

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरी भागातील लोकांच्या हितासाठी असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील पायाभूत विकासासह सर्वांसाठी परवडणारी घरे या केंद्राच्या महत्त्वकांक्षी योजनेवरही अर्थमंत्र्यांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसते. देशात जे बांधकाम विकसक सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधत आहेत, अशा विकसकांना एक वर्षासाठी कर विश्रांती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 

Budget 2020 : आधार कार्ड असेल तर अर्जाशिवाय मिळणार पॅन कार्ड

परवडणाऱ्या घरांच्या पुरवठ्यास चालना देण्यासाठी अशा बांधकाम विकसकांना त्यांना मिळत असलेल्या नफ्यातून कर विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कर विश्रांती आणखी एक वर्ष वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत दिली. 

Union Budget 2020: शेतकऱ्यांसाठीची ती घोषणाच फसवी : थोरात

परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या कर्जावरील दीड लाखांची अतिरिक्त व्याज कपात देण्याची सरकारची योजना आहे. केंद्र सरकार गेल्या एक वर्षांपासून गृहनिर्माण क्षेत्रातील सुधारणेसाठी अनेक घोषणा करत आहे. गेल्यावेळी या क्षेत्रासाठी २५ हजार कोटींची तरतूद सरकारने केली होती. तरीही बांधकाम व्यावसायिक सरकारच्या या निर्णयावर खूश नाहीत. 

Union budget 2020:प्रत्येक जिल्ह्यात आयुष्मान भारत रुग्णालय, २०२५ पर्यंत टीबीमुक्त देश

हा अत्यंत निराशजनक अर्थसंकल्प असून यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात मागणी वाढणार नाही, असे क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांनी म्हटले आहे.