पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Union budget 2020:प्रत्येक जिल्ह्यात आयुष्मान भारत रुग्णालय, २०२५ पर्यंत टीबीमुक्त देश

रुग्णालय (संग्रहित छायाचित्र)

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य क्षेत्रासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशातील नागरिकांच्या आरोग्याकडे केंद्र सरकार गांभीर्याने पाहत असल्याचे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर येत्या काळात देशातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

- ६९ हजार कोटी रुपये आरोग्य क्षेत्रासाठी प्रस्तावित आहेत. यामध्ये पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या ६४०० कोटी रुपयांचाही समावेश आहे.

-  पीएम जनआरोग्य योजनेअंतर्गत २० हजाराहून अधिक रुग्णालये पॅनलमध्ये आहेत. त्यात वाढ केली जाणार आहे.

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

- मिशन इंद्रधनुष्यचा विस्तार वाढवून यामध्ये १२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पाच नवीन लसी जोडण्यात आले आहेत. 

- पीएम जनआरोग्य योजनेत २० हजारांहून अधिक रुग्णालये जोडले गेले आहेत. या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारतच्या लाभार्थींवर उपचार केले जाते. टिअर २ आणि टिअर ३ शहरात आणि पीपीपी माध्यमातून उभारले जातील.

- पहिल्या टप्प्यात ११२ जिल्ह्यात याची सुरुवात होईल. यामध्येही ज्या जिल्ह्यात एकही रुग्णालय पॅनलमध्ये नाही. त्यांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतील.

- वैद्यकीय उपकरणांवर जो कर लावला जातो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून रुग्णालये उभारली जाणार आहेत. 

- २०२४ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात जन औषधी केंद्र सुरु करणार. यामध्ये २ हजार औषधे आणि ३ हजार सर्जिकल्स उपलब्ध होतील.

- देशात फिट इंडिया अभियान स्वच्छ भारत मिशन यशस्वीपणे सुरु असल्याचे अर्थमंत्री सीतारमन यांनी म्हटले.

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारावर मोठा परिणाम

- टीबी हारेगा, देश जितेगा हे अभियान लाँच करण्यात आले. २०२५ पर्यंत टीबी भारतातून समूळ नष्ट करण्याचे उद्धिष्ट

- हागणदारी मुक्तीसाठी स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवली जाणार. घनकचरा संकलनावर लक्ष केंद्रित केले जाणार. यावर्षी २०२०-२१ मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी १२३०० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.

- प्रत्येक घरापर्यंत पाईपने पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशनवर काम चालू आहे. यामध्ये ३.६ लाख कोटी रुपये दिले जात आहेत. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात ही योजना याचवर्षी लागू करण्याचे लक्ष्य आहे.

Union Budget 2020: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये