पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2020 : .. असे आहेत Income Tax स्लॅबमधील बदल आणि नवे दर

प्राप्तिकर आकारणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे

वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पात केली. प्राप्तिकराच्या टप्प्यांमध्ये (स्लॅब) मोठे बदल करण्यात आले आहेत. वैयक्तिक प्राप्तीकरदात्याने प्राप्तीकर भरताना कोणतीही वजावट दाखवली नाही तरच त्याला हे नवे दर लागू राहतील. अन्यथा प्राप्तीकरदात्यांना जुन्या कर दराप्रमाणेच प्राप्तीकर भरावा लागले. त्याचबरोबर वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी प्राप्तिकराच्या आकारणीमध्येही बदल करण्यात आला आहे. प्राप्तिकराचे आकारणी दर कमी करण्यात आले आहेत. 

ग्रामीण भागाला जोडण्यासाठी 'भारतनेट', एक लाख ग्राम पंचायती जोडणार

नव्या रचनेनुसार पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना काहीही प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. त्यापुढे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी पुढील प्रमाणे प्राप्तिकर आकारण्यात येईल.

कोरोनाची लक्षणे आढळल्यानं दोन भारतीयांना परतण्यापासून चीननं रोखले

वार्षिक उत्पन्न आणि नवा प्राप्तिकर 
५ ते ७.५ लाख रुपये -  १० टक्के (आधी २० टक्के प्राप्तिकर होता)
७.५ ते १० लाख रुपये -  १५ टक्के (आधी २० टक्के प्राप्तिकर होता)
१० ते १२.५ लाख रुपये - २० टक्के (आधी ३० टक्के प्राप्तिकर होता)
१२.५ ते १५ लाख रुपये -  २५ टक्के (आधी ३० टक्के प्राप्तिकर होता)
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न -  ३० टक्के

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Budget 2020 Income tax rates will be significantly reduced announced by FM Nirmala Sitharaman