पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बँक ठेवीदारांना मोठा दिलासा, ठेवींवर आता पाच लाखांचा विमा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

बँक ठेवीदारांना दिलासा देणारी मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केली. गेल्या काही वर्षांमध्ये विविध बँका वेगवेगळ्या कारणांमुळे आर्थिक अडचणीत येत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक नुकसान होते आहे. या पार्श्वभूमीवर बँक ठेवींवर सध्या दिला जाणारा एक लाख रुपयांच्या विम्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापुढे बँक ठेवीदारांना पाच लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. निर्मला सीतारामन यांनीच शनिवारी ही माहिती दिली.

Budget 2020 : .. असे आहेत Income Tax स्लॅबमधील बदल आणि नवे दर

त्या म्हणाल्या, सध्या प्रत्येक ठेवीदाराला बँक खात्यातील ठेवींवर एक लाख रुपयांचा विमा मिळतो. त्यामध्ये वाढ करण्याला 'डिपॉझिट इन्शुरन्स एँड क्रेडिट गँरंटी कॉर्पोरेशन'ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या बँक ठेवींवर एकत्रितपणे पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. 

ग्रामीण भागाला जोडण्यासाठी 'भारतनेट', एक लाख ग्राम पंचायती जोडणार

जर कोणत्याही कारणामुळे बँक दिवाळखोरीत निघाली किंवा ठेवीदारांचे पैसे देण्यास बँक नाकर्ती ठरली तर त्या स्थिती या विम्याच्या माध्यमातून ठेवीदारांना आर्थिक मदत केली जाऊ शकेल. सामान्य ठेवीदारांना मोठा दिलासा देणारी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.