पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019: नोटबंदीचा जीडीपीवर परिणाम नाही, अर्थमंत्री सीतारामन यांचे स्पष्टीकरण

नोटबंदीचा जीडीपीवर परिणाम नाही, अर्थमंत्री सीतारामन यांचे स्पष्टीकरण

कृषि आणि बांधकाम क्षेत्रात मंदी असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा हवाला देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोटबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताच नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे. 

सीतारामन या राज्यसभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, उत्पादन क्षेत्राची गती वेगळ्या कारणामुळे मंदावली आहे. यात नोटबंदीचा काहीच संबंध नाही. सकल घरगुती उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध सुधारणा कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत.

निर्मला सीतारामण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री

कृषि, हॉटेल, परिवहन, गोदाम आणि सेवा क्षेत्रासह इतर व्यवसाय क्षेत्रात २०१८-१९ मध्ये वृद्धी दरात सुधारणा झाली असल्याचे त्यांनी म्हटले. मंदी असतानाही भारत, अमेरिका आणि चीनसह इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक तेजीने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे.

त्या म्हणाल्या की, अमेरिकेचा वृद्धी दर २०१६ ते २०१९ पर्यंत १.६ ते २.३ टक्के दरम्यान राहिला. याच कालावधीत चीनचा वृद्धी दर हा ६.७ ते ६.३ टक्के दरम्यान राहिला. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा ७ ते ७.३ टक्क्यांहून अधिक आहे.

अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता

या दिशेने अधिक सुधारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सम्मान योजना आणि पेन्शन योजनेसारख्या थेट जनतेला आर्थिक लाभ पोहोचवणाऱ्या योजनांचा यात समावेश आहे. यामध्ये योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात.

ST चा फायदा ग्राहकांना न दिल्यास कंपन्यांना १० टक्के दंड

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:budget 2019 union budget 2019 Demonetisation had no effect on Indian economy Says Nirmala Sitharaman in Rajya Sabha