पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वेला ५० लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज, पीपीपी मॉडेल राबवण्यावर भर

रेल्वे अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही वर्षांत भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेली  सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचा मानस असणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेत खासगी भागिदारी वाढवण्यावर जोर देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

देशात रेल्वेमार्गाचं मोठं जाळं आहे, प्रवासासाठी सर्वात मोठी लोकसंख्या ही रेल्वेमार्गावरही अवलंबून आहे. रेल्वेच्या विकासासाठी  येत्या काही वर्षांत ५० लाख कोटींची आवश्यकता आहे असं त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी नमूद केलं. २०३० पर्यंत रेल्वेमार्गातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५० लाख कोटींच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

Budget 2019 काय स्वस्त अन् काय महागलं!

यापुढे रेल्वेत पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप) मॉडल राबवण्यावर भर असणार आहे. यामुळे रखडलेल्या प्रकल्पानां गती मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सीतारामन यांनी मुंबई लोकलचं उदाहरण देखील दिलं.  भारतीय रेल्वे ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. मोठा वर्ग प्रवासासाठी रेल्वेवर अवलंबून आहे त्यामुळे लोकलव्यतिरिक्त मेट्रोचं जाळं शहरात वाढवण्याचा प्रयत्न असणार  आहे असंही त्या म्हणाल्या. यामुळे जलद गतीनं आणि कोणत्याही अडचणींशिवाय प्रवास करता येणार आहे. याव्यतिरिक्त रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची मोठी योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

Union Budget 2019 : आधीच सोने महाग, त्यात सीमाशुल्कात वाढ

२०१६ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प वेगळा सादर केला जायचा. मात्र  ९२ वर्षांची ही परंपरा खंडीत करून  रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:budget 2019 Railway Budget 2019 unleashing the PPP for faster development of railway infrastructure