पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बजेट इम्पॅक्टः एकाच दिवसात सोने १३०० रुपयांनी वधारले

सोनं (संग्रहित छायाचित्र)

सरकारने सोन्यावरील शुल्क वाढवल्याने अपेक्षेप्रमाणे दिल्ली सराफा बाजारात शनिवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात १,३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून सोने ३५,४७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात सोने पहिल्यांदाच इतके महागले आहे. सरकारने शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने तसेच महागड्या धातूंवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून वाढवून १२.५ टक्के केले आहे. 

Union Budget 2019 : आधीच सोने महाग, त्यात सीमाशुल्कात वाढ

गेल्या काही महिन्यांपासून देशात सोन्याच्या किंमती सातत्याने वाढताहेत. काही दिवसांपूर्वीच सोन्याचे दराने विक्रमी आकडा गाठला होता. त्यातच आता सीमाशुल्कात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोने आणखी महागले. आपल्याकडे सणासुदीला, लग्न-समारंभात सोने खरेदी करण्याची आणि सोन्याचे दागिने घालण्याची प्रथाच आहे. त्यामुळे मंदीच्या काळातही सोन्याची मागणी कायम राहत असल्याचे दिसून आले आहे. 

सोन्याबरोबरच चांदीदेखील २८० रुपयांच्या वाढीसह एका आठवड्याच्या उच्चांकी ३८,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. विदेशात आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसून आला नाही.

Union Budget 2019 : काय सांगता! पॅनकार्ड नाही, हरकत नाही...