पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ डीलवर आनंद महिंद्रांचे टि्वट

आनंद महिंद्रा

रिलायन्स जिओ आणि फेसबुकदरम्यान सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचा ऐतिहासिक करार झाला. यावरुन आनंद महिंद्रा यांनी टि्वट करुन मुकेश अंबानी यांचे मोठे कौतुक केले आहे. ब्राव्हो मुकेश, हा केवळ दोन कंपन्यांमधील करार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार

आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. २१ वे शतक भारताचे असेल ही कल्पना या करारामुळे प्रत्यक्षात येईल. विकासाचे केंद्र म्हणून जग भारताकडे पाहील. 

लोकसभेपाठोपाठ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील कर्मचाऱ्याला कोरोना

रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून बुधवारी करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

फेसबूककडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओ लिमिटेडमध्ये ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा आम्ही आज करतो आहोत. जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कंपनी आहे. या गुंतवणुकीनंतर फेसबूक ही या कंपनीतील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी एक लहान गुंतवणूकदार झाली आहे.

कोरोनाः देशातील ६४% मृत्यू फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील