पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिल गेट्स यांची श्रीमंतांच्या यादीत घसरण, दुसऱ्या क्रमांकावर कोण माहितीये?

बिल गेट्स

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गेल्या सात वर्षांत मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक बिल गेट्स कधीही दुसऱ्या क्रमांकाच्या खाली उतरले नव्हते. पण यावेळी त्यांना आपले हे स्थान गमवावे लागले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत बिल गेट्स यावेळी दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत. दुसऱ्या क्रमांकवर यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांची वर्णी लागली आहे.

'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र'लाच प्राधान्य - चंद्रकांत पाटील

अलिशान आणि चैनीच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे प्रमुख असलेले बर्नार्ड अरनॉल्ट यांचे निव्वळ उत्पन्न १०७.६ अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचले आहे. बुधवारी त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या भावात पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात वधारणा झाली. ही वाढ ०.७ टक्के इतकी होती. २०१९ या चालू वर्षातच बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत एकूण ३९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 

हाफीज सईदच्या अटकेवर ट्रम्प यांचे ट्विट; दोन वर्षाचा दबाव कामी आला

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले ऍमेझॉनचे जेफ बेझॉस यांच्यानंतर यादीमध्ये आता बर्नार्ड अरनॉल्ट यांचा क्रमांक लागला आहे. त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरच्या पुढे गेल्यावर त्यांचा यादीमध्ये पहिल्यांदाच समावेश झाला होता. विशेष म्हणजे यादीतील पहिल्या तिघांचे एकत्रित उत्पन्न हे अमेरिकेतील दिग्गज ५०० कंपन्यांपैकी प्रत्येकाच्या वैयक्तिक बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये वॉलमार्ट, एक्सॉन मोबाईल कॉर्प, वॉल्ट डिस्ने यांचा समावेश होतो.