पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाः १९३० च्या दशकातील आर्थिक मंदीनंतरचे सर्वांत मोठे संकट

आयएमएफच्या १८९ सदस्य देशांपैकी १०२ देशांनी आतापर्यंत मदत मागितली आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अनेक देशांनी मदतीची मागणी केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी दिली. आयएमएफच्या १८९ सदस्य देशांपैकी १०२ देशांनी आतापर्यंत मदत मागितली असल्याचे त्या म्हणाल्या. या देशांना मदतीसाठी आयएमएफ १००० अब्ज डॉलर कर्जाचे वितरण करणार असल्याचे त्यांनी जागतिक बँकेबरोबरील बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

'लॉकडाऊन हे काही कोरोनावर उत्तर नाही, तो केवळ तात्पुरता पर्याय'

ख्रिस्तालिना जॉर्जिवा आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास दोघांनी जी-२० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरकडून कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. आयएमएफच्या अंदाजानानुसार, या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत तीन टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक आर्थिक संकटादरम्यान २००९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत ०.१ टक्क्यांची घसरण झाली होती. 

आर्थिक क्षेत्रात भारताने उचललेले पाऊल योग्यः आयएमएफ

आता १७० देशात प्रती व्यक्ती उत्पन्नात घट होण्याची शक्यता

जॉर्जिवा म्हणाल्या की, हे एक असे संकट आहे, जे पूर्वी कधीच पाहण्यात आले नव्हते. या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था १९३० च्या दशकातील मोठ्या आर्थिक मंदीनंतरच्या सर्वांत मोठ्या संकटातून जात आहे. जागतिक जीडीपीमध्ये तीन टक्क्यांची घसरण होऊ शकते. तीन महिन्यांपूर्वी आमचा अंदाज होता की, आमच्या सदस्य देशांपैकी १६० देशांमध्ये प्रती व्यक्ती उत्पन्नात वाढ होईल. परंतु, आता १७० देशात प्रती व्यक्ती उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. 

चिंताजनकः सोलापुरात १० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जर दीर्घकाळापर्यंत या विषाणूचा कहर सुरु राहिल्यास किंवा यावर औषध शोधण्यास उशीर झाल्यास परिस्थिती आणखी खराब होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:biggest crisis since economic recession of 1930s IMF help 1000 billion dollars to countries fighting against Corona