पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सबसिडीशिवाय घरगुती गॅससाठी मोजावी लागणार अधिक रक्कम!

गॅसचे दर वाढले

सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानापेक्षा अधिक गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वृद्धी करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ग्राहकांना १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता पूर्वीपेक्षा १४५ रुपये अगाऊ मोजावे लागणार आहेत. दिल्लीमध्ये आणि कोलकातामध्ये अनुक्रमे १४४.५० रुपये आणि १४९ रुपये असे नवे दर असतील.

शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; एकाच अर्जावर मिळणार अनेक योजनांचा लाभ

एएनआयच्या वृत्तानुसार, १ जानेवारीपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. नव्या दरानुसार, मुंबईतील ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलिंडरसाठी ८२९.५० रुपये मोजावे लागतील. दिल्लीमध्ये १४ किलो घरगुती गॅस सिलिंडरचा दर ८५८.५० रुपये तर कोलकातामध्ये गॅस सिलिंडरसाठी ८९६  मोजावे लागणार आहेत. चेन्नईच्या ग्राहकांना १४७ रुपयेच्या वाढीसह १४ किलो गॅस सिलिंडरसाठी ८८१ रुपये मोजावे लागतील.  

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, पाच दिवसांचा आठवडा
 
गॅस सिलिंडरवरील अनुदान (सबसिडी) 

सध्याच्या घडीला सरकारकडून प्रत्येक घरासाठी १४.२ किलो ग्रॅमच्या १२ सिलिंडरसाठी अनुदान दिले जाते. यापेक्षा अधिक सिलिंडर आवश्यक असतील तर ग्राहकांना बाजार मुल्यांप्रमाणे सिलिंडर घ्यावे लागते. सरकारकडून वर्षाला मिळणाऱ्या १२ अनुदानित सिलिंडरच्या किमती देखील आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार बदलत असतात.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Big shock domestic gas cylinder prices have increased by Rs 149 now on 829 rupees in mumbai