पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी घट, हे आहे कारण...

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशात कपात झाली. मंगळवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११ पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर १३ पैशांनी कमी झाले. गेल्या सहा दिवसांत सातत्याने घसरण होत असल्याने पेट्रोलचे दर प्रतिलिटर १.२२ रुपयांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर १.४७ रुपयांनी कमी झाले.

मारुतीच्या गाड्या महागल्या, नवे दर अमलात

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७९.२१ रुपये तर डिझेलचे दर प्रतिलिटर ६९.७९ इतके आहेत. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ७३.६० रुपये तर डिझेलचे दर प्रतिलिटर ६६.५८ रुपये इतके आहेत. गेल्या सहा दिवसांत सातत्याने घसरण झाल्यामुळे नोव्हेंबर २०१९ च्या मध्यामध्ये देशात पेट्रोलचे दर ज्या पातळीवर होते. तिथेच ते परत आले आहेत. तर डिझेलचे दर डिसेंबर २०१९ मध्येमध्ये ज्या पातळीवर होते तिथंपर्यंत कमी झाले आहेत.

विवाहबाह्य संबंधातून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या

अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ८ जानेवारीच्या सुमारास कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ७० डॉलरवर जाऊन पोहोचले होते. पण त्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ६० डॉलरपर्यंत खाली आले आहेत.