पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅरीबॅगसाठी १८ रुपये घेतल्याने बिग बाजारला ११ हजारांचा दंड

बिग बाजार

कापडी कॅरीबॅगसाठी ग्राहकाकडून वेगळे १८ रुपये घेतल्यामुळे चंदीगढमधील बिग बाझारच्या व्यवस्थापनाला ११५१८ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी १० हजार रुपये हे ग्राहक कायदेशीर मदत निधीला द्यायचा आहेत तर उर्वरित १५१८ रुपये पंचकुलामध्ये राहणाऱ्या तक्रारदार ग्राहकाला द्यायचे आहेत. बलदेव राज असे या तक्रारदार ग्राहकाचे नाव आहे.

शरद पवार ट्रेंडिंगमध्ये, अनेकांकडून 'साहेबां'ना सलाम!

औद्योगिक वसाहत भागात असलेल्या बिग बाजारमधील रोखपालाने बलदेव राज यांच्याकडून कापडी कॅरीबॅगसाठी १८ रुपये घेतले. २० मार्च रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर बलदेव राज यांनी याविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. या महादुकानात कुठेही कापडी कॅरीबॅगसाठी १८ रुपये वेगळे घेतले जातील, असे लिहिलेले नाही, असा युक्तिवाद त्यांनी आपल्या अर्जामध्ये केले. हा चुकीच्या पद्धतीने व्यापार करण्याचा प्रकार आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त

बिग बाजार व्यवस्थापनाने आपण कोणतीही चूक केली नसल्याचे सांगितले. कापडी कॅरीबॅगसाठी वेगळे पैसे आकारले जातील, असे महादुकानात लिहिण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर ग्राहक न्यायालयाने ग्राहकाची बाजू उचलून धरली. कॅरीबॅगची किंमत काय आहे, याबद्दल ग्राहकांला नीटपणे आधीपासून माहिती देण्यात आलेली नाही, असे निरीक्षण नोंदवत बिग बाजार व्यवस्थापनाला दंड ठोठावला.