पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनमोहन सिंग, रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच बँकांना वाईट दिवस - निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेचे तत्कालिन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाईट दिवस आल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. कोलंबिया विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल एँड पब्लिक एफेअर्स'च्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले. त्याचबरोबर सध्या बँकांना पाठबळ देणे हाच सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले.

खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला; हल्लेखोराला अटक

उच्चशिक्षित ज्ञानवंत असल्याबद्दल रघुराम राजन यांच्याबद्दल मला आदर आहे. भारताचा विकासदर जेव्हा उंचावर होता. त्यावेळी त्यांनी देशातील मध्यवर्ती बँकेचे नेतृत्त्व केले. पण ते बँकेचे नेतृत्त्व करीत असतानाच बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये महत्त्वाचे दोष होते. त्यांच्या कार्यकाळातच काही धनाढ्य लोकांना केवळ फोन कॉलवर कर्ज दिले गेले. त्यामुळे झालेल्या नुकसानातून बाहेर पडण्यासाठी आजही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'कलम ३७०चा महाराष्ट्राशी काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे'

डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्याकडे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल व्हिजन होती. तरीही असे घडले आहे, याच्याशी डॉ. रघुराम राजन माझ्याशी सहमत असतील, असाही टोमणा निर्मला सीतारामन यांनी मारला. मी या विषयाकडे गंभीरपणे पाहते आहे. मला कोणाचीही मस्करी करायची नाही. पण वस्तुस्थिती काय आहे, हे सुद्धा सगळ्यांसमोर आले पाहिजे. डॉ. सिंग आणि डॉ. राजन यांच्या काळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाईट दिवस आले, असे त्यांनी सांगितले.