पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेटचे पुन्हा उड्डाणाचे स्वप्न भंगले, दिवाळखोरीच्या कारवाईला सुरुवात

जेट एअरवेज

गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गर्तेत सापडलेली जेट एअरवेज ही खासगी विमान वाहतूक कंपनी दिवाळखोरीत काढण्याच्या दिशेने बँकांनी पहिले पाऊल टाकले आहे. जेटची खरेदी करण्यासाठी एतिहाद आणि हिंदूजा समूह यांनी दिलेल्या प्रस्तावात कठोर अटी घालण्यात आल्याचे सांगत बँकांनी त्यांचा प्रस्ताव सोमवारी फेटाळला. त्याचबरोबर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधीकरणाकडे NCLT हे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय घेतला.

स्टेट बँकेकडून नव्या पद्धतीने गृहकर्ज, १ जुलैपासून ग्राहकांपुढे दोन पर्याय

जेट एअरवेजला कर्ज दिलेल्या बँकांच्या समूहाचे नेतृत्त्व करणाऱ्या स्टेट बँकेने या संदर्भात जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे की, जेट एअरवेजच्या खरेदीसाठी केवळ एकच बोली लावण्यात आली होती. पण त्यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या होत्या. जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी नवा गुंतवणूकदार शोधण्याचे प्रयत्न बँकांकडून करण्यात आले. पण त्याला यश आले नाही. 

जेट एअरवेजला कर्जाने पैसे देणाऱ्या शामन व्हिल्स आणि गग्गर एंटरप्रायजेस या दोन कंपन्यांनी या एअरलाईन्सविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी या आधीच राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधीकरणाकडे अर्ज दाखल केला आहे. त्यावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. जेट एअरवेजकडून शामन व्हिल्सला ८.७४ कोटी रुपये तर गग्गर एंटरप्रायजेसला ५३ कोटी रुपयांचे देणे आहे. 

वाहनांचा विमा महागला, गाड्यांच्या किमतीही वाढणार

जेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात एतिहाद आणि हिंदूजा समूहाने बँकांना त्यांचे ९५ टक्के माफ करण्याची अट घातली होती. या दोन्ही कंपन्यांकडून केवळ पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती.