पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे

स्टेट बँक ऑफ इंडिया

बँक कर्मचाऱ्यांनी दि. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. बँक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. बँक अधिकाऱ्यांच्या चार संघटनांनी २६ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. बँक कर्मचारी संघटनांच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल आहे. 

एक ऑक्टोबरपासून SBI देणार 'ही' खास सुविधा, ग्राहकांना होणार लाभ

दि. २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री ते २७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बँक कर्मचारी संपावर जाणार होते. या संपात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन, इंडियन बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायजेशन बँक ऑफिसर्स या संघटनेचा समावेश होता.

... म्हणून कंपनी करात कपात करून फारसा उपयोग नाही