पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बँक कामासाठी बुधवारी जाणार असाल तर आधी माहिती घ्या...

बँक कामकाज

येत्या बुधवारी, ८ जानेवारीला होत असलेल्या देशव्यापी भारत बंदमध्ये बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार असल्यामुळे त्या दिवशी देशातील बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील १० कर्मचारी संघटनांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या धोरणांविरोधात हा बंद पुकारला असून, त्याला डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी सहभागी होत आहेत.

'बाळासाहेब ठाकरेंना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो'

बंदमध्ये सरकारी बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटना सहभागी होत आहेत. यामुळे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या देशातील सर्व शाखांचे कामकाज बंद राहू शकते. कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी बँकांच्या चाव्या आपल्याकडे घेऊ नयेत, असे संघटनांनी म्हटले आहे. बंदमुळे काही ठिकाणी एटीएम सेवाही बंद राहण्याची शक्यता आहे. फक्त बुधवारी ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहील. 

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने म्हटले आहे की, भारत बंदचा मोठा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार नाही. त्याचवेळी बँक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार बंदमुळे बँकेचे कामकाज विस्कळीत होऊ शकते. बंदच्या काळात बँकेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेतली असल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांच्या नाराजीत वाढ, मिळालेल्या खात्यावरून असमाधान

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, बँक एम्प्लाईज फेडरेशन ऑफ इंडिया यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे ठरविले आहे. त्याला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशनने पाठिंबा दिला आहे.