पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलग ४ दिवस बँक राहणार बंद; महत्वाची कामं आताच करा

बँक राहणार बंद

सलग ४ दिवस बँक बंद राहणार आहेत त्यामुळे बँकांचे व्यवहार आताच उरकून घ्यावे लागणार आहे. देशातील चार वेगवेगळ्या बँक अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये देशभरातील बँक कर्माचारी सहभागी होणार आहेत. मोदी सरकारने देशातील १० सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे.  

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

बँक कर्मचाऱ्यांनी २६ आणि २७ सप्टेंबर असे दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे. त्यानंतर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बँकांना सुट्टी असल्याने २८ सप्टेंबर रोजी बँकेचे काम बंद राहणार आहे. तर २९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असते. त्यामुळे सलग ४ दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरिकांना बँकाचे व्यवहार आताच उरकावे लागणार आहे. 

मोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

केंद्र सरकारने ३० ऑगस्ट रोजी देशातील १० सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिस या चार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. 

भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

एआयबीओसीचे महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी सांगितले की, देशभरातील राष्ट्रीयकृत बँक २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री संपावर जाणार आहे. तर २७ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत हा संप सुरु राहणार आहे. बँकांच्या विलिनिकरणाला विरोध आणि अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दिल्ली दरबारात रंगणार