पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील बँकांमध्ये एका वर्षात ७१ हजार कोटींचे घोटाळे

देशातील बँकांमध्ये एका वर्षात ७१ हजार कोटींचे घोटाळे  (प्रतिकात्मक छायाचित्र)

बँकांबरोबर होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या एक वर्षात बँक घोटाळ्यात ७३.६८ % वाढ झाली असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात देशातील बँकांमध्ये ७१.५०० कोटी रुपयांचे एकूण ६,८०० बँक घोटाळे झाल्याची अशी धक्कादायक माहिती आरबीआयने सोमवारी दिली. एका पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत या विषयी विचारणा केली होती. 

अर्थव्यस्थेला धक्का, जीडीपी ७ टक्क्यांच्या खाली तर विकासदर ५.८ %

या तुलनेत २०१७-१८मध्ये ५,९१६ घोटाळ्यांची प्रकरणे झाली होती. यामध्ये एकूण ४१,१६७.०३ कोटी रुपयांचे घोटाळे झाले असल्याची माहिती आरबीआयने  दिली आहे. गेल्या ११ आर्थिक वर्षामध्ये घोटाळ्याची एकूण ५३,३३४ प्रकरणे झाली. यामध्ये बँकांना एकूण २.०५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.  

कर्जाचे हफ्ते वेळेत भरले नाही तर काय होते माहितीये?

गुन्हा अन्वेषण खात्याने २०१८ मध्ये दोन सार्वजनिक बँकांच्या अधिकाऱ्यांना पकडले होते. यामध्ये आयडीबीआय बँकेचे माजी सीएमडी, एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. सिवाकरन यांच्या मुलाला त्याने नियंत्रित केलेल्या कंपन्यांना दिलेल्या ६०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात अटक केली होती. हे कर्ज आयडीबीआय बँकेने दिले होते. या प्रकरणी सीव्हीसीने प्रकरण दाखल केले. त्यानंतर २०१० ते २०१४ या कालावधीत आयडीबीआय बँकेत वरिष्ठ पदावरच्या १५ अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रकरण दाखल करण्यात आले. सीव्हीसी बरोबर सीबीआय देखील मोठ्या बँक घोटाळ्यांचा तपास करत आहे. 

समजून घ्या बचत खात्यासाठी बँका कोणकोणत्या प्रकारचे शुल्क आकारतात